हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलं होत. यावर आता राष्ट्रवादी कडून प्रत्युत्तर आलं आहे.
‘सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा..’ अशी बोचरी टीका बीड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांनी केली आहे.
सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा.. https://t.co/1rcW9bZKnf
— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) December 24, 2020
नक्की काय म्हणाले सदाभाऊ खोत
शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलं होत. पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’