हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस स्टेशन मध्ये धिंगाणा घालत पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच पोलिसांवरच 50 लाखांच्या चोरीचा आरोप केल्यामुळे राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे.
कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या वाजताच्या सुमारास घरून 50 लक्ष रुपयांची रोकड घेऊन तुमसरकडे जात होते. त्यावेळेस गाडी वळवताना इंडीकेटर का दाखवला नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच करेमोरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांच्या व्यापारी मित्र जवळील ५० लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी पळविले असल्याचा आरोप करीत धिंगाणा घातला. यानंतर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिश उप निरीक्षक राणे यांनी फिर्यादी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफी देखील मागितली होती. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली.