हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या सर्वत्र अशांतता पसरली आहे. बदनामीचे राजकार केले जात असल्याचे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करीत परमेश्वराकडे एक प्रार्थना केली आहे. “खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो,” असे पवार यांनी ट्विट करीत भाजपला टोला लगावला आहे.
पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे ! यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो “!
सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!
यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो! https://t.co/04BcMbneWP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2021
सीबीआयच्यावतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची लक्ष सुरु आहे. यावरून रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला असून आता सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाची अस्वस्थता अजून वाढणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
रोहित पवार यांनी ट्विटसोबत आणखी एक ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राजीनामा दिला होता याचा उल्लेख केला आहे. रोहित पवारांच्या ट्विटनंतर याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.