अनुभवाचा अभाव असलेले मोदी सरकार फक्त अर्थव्यस्थेच्या बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतेय- रोहीत पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । कोरोना महामारीचा प्रचंड आर्थिक फटका देशाला बसला असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी मोदी सरकारनं पावलं उचलण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी कोरोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणामकारण धोरण आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

“कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाल प्रभाव राहील,असं दिसतंय.त्यासाठी अर्थव्यवसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कठोर धोरणं आखावी लागतील.पण दुर्दैवाने,केंद्र सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रे बुजवण्याचा प्रतिसाद देण्याऐवजी केवळ प्रतिक्रिया देण्यातच व्यस्त आहे.यात अनुभवाचा स्पष्ट अभाव दिसतो आहे,” असं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला. यातून निर्माण झालेल्या नवीन आर्थिक समस्या संदर्भात केंद्र सरकारनं सक्रिय धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे देशाचा जीडीपीही आक्रसला असून, अनेक उद्योगांना घरघर लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बेरोजगारीचा प्रश्न वेगानं पुढे येताना दिसत असताना रोहित पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांमध्ये अनुभवाचा अभाव दिसत असल्याचे नमूद केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.