पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जबरदस्त ट्वीट करत श्रीरामाकडे एक प्रार्थना केली आहे. सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खूण असते. साने गुरूजी म्हणायचे, ‘रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं’. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.’
रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, 'रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं'. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत. pic.twitter.com/3ugYP5guQP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2020
ते पुढं म्हणतात, ‘राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे’.
‘रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात, निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये,’ अशी अपेक्षा रोहित पवार यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये.
आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!!!रामकृष्णहरी
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”