हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. त्यामुळे देशभरातून त्यांच्यासाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील ट्विट करत आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्यांनी पवारांना आपला आधारवड अस म्हणल आहे.
महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.
महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड!
आदरणीय @PawarSpeaks साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा! pic.twitter.com/p4vduHUjGb— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2020
शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. राजकीय जीवनात अनेक नेत्यांच्या वाट्याला येतात तसे चढउतार पवारांच्याही वाट्याला आले. मात्र कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’