माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ऐकलय; मलिकांच्या ट्विटने चर्चाना उधाण

nawab malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यातील कलगीतुऱ्या मुळे चर्चेत आहेत. त्याच दरम्यान त्यांनी एक ट्विट करत खळबळ उडवली आहे. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ऐकलय अस ट्विट नवाब मलिक यांनी करताच पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.

‘मी ऐकलं आहे की आज उद्यामध्ये माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू’, असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे. घाबरणं म्हणजे रोज मरणं. आपल्याला घाबरायचं नाही, लढायचं आहे, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

 

दरम्यान, मलिक यांच्याट्विट नंतर केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकणार आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर, कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी शरद पवारांना विचारलं असता, सरकारी पाहुणे येऊन गेले. त्यांची भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सरकारी पाहुण्यांचा उल्लेख केल्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत.