हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटक यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. देशमुख राजीनामा देणार अशा बातम्याही चर्चेत आल्या. गृहमंत्री खात्यासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याची चर्चा असताना आता या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे. मात्र स्वत: राजेश टोपे यांनी सध्या तरी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. गृहमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता राजेश टोपे यांनी स्पष्ट शब्दांत खोडून काढली आहे.
राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नाही,’ असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group