अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळली आहे,यामुळे या ‘नेत्यांनी’ संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहेत असा आरोप भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

सांगलीची जनता सुज्ञ असून या जातीयवादाला भिक घालणार नाही,संभाजी महाराजांचा मुखवटा करुन कोणी मराठा समाजाला भूलवू नये, असा इशाराही जयंत पाटील यांचे नाव न घेता पवार यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील भाजप-सेना महायुतीच्या सर्वच उमेदवारांना मतदारांनी मतदान करुन काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज हा सुशिक्षित व कष्टाळू आहे,सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज कधीच जातीयवादाला बळी पडणार नाही. मी त्याचे उदाहरण आहे, शहरी पक्ष म्हणून गणल्या जाणार्‍या भाजप पक्षाला जिल्ह्यात रुजवण्याचे काम मराठा नेतृत्व म्हणून मी स्वतः अनेक वर्षापासून पार पाडत आहे. आज पक्ष विशाल वटवृक्षाप्रमाणे बहरला आहे,यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त सांगली जिल्हा झाला पाहिजे. विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे, राष्ट्रवादीकडे सध्या चेहराच उरला नाही, भाजपाची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराचा मद्दाच संपला,म्हणून मराठा समाजाला चिथावणी देण्याचे काम सुरु आहे, त्यांना जनतेसमोर जाता येईना म्हणून अभिनेत्याला पुढे करुन जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सांगली विधानसभा मतदारसंघासह अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे नेते अभिनेत्याच्या आडून जातीयवाद पोसत आहेत.आमचे उद्दीष्ट हे जयंत पाटील यांचा पराभव हेच आहे. जातीयवाद रोखण्यासाठी आम्ही तयार आहोत असेही ते म्हणाले.

गौतम पवार, पृथ्वीराज पवार म्हणाले, भाजपाचे केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकारने सर्वोदय कारखाना प्रकरणात आम्हला पुर्णपणे सकारात्मक सहकार्य केले. सर्वोदयचा झालेला व्यवहार संशयास्पद असल्याचे केंद्राला समजले.लिलाव नाही,बोली नाही, सरळ सावकारीचा करार करुन कारखाना घेतला,सरकार बदलल्यानंतर भाजप सरकारने अन्यायकारक कायदे बदलले, यात आम्हाला न्याय मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं.