हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाच्यावतीने बाबासाहेबांच्या निधनाची अधिकृत दिली. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली. “महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होत. वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली. शिवरायांचं चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवले आहे,”असे पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबाबत माध्यमसनही संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवरायांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत जगासमोर मांडला. आज ते आपल्यामध्ये मांडले नाहीत. वयाची शंभरी हि यशस्वी होणार नाही. मात्र, त्यांनी त्यांनी केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास मांडला. त्यामध्ये काही वादग्रस्तही वक्तव्ये होती. त्यामुळे त्यांच्याविरोधातही काहींनी काही टीका केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.
खासदार शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ज्यांनी शेकडो व्याख्याने घेतली आणि नव्या पिढीला याबाबत आस्था निर्माण केली असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !,”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 15, 2021
बाबासाहेबांची लेखणी अत्यंत प्रभावशाली होती. त्यांनी इतिहासातील खरे मुद्दे आपल्या लेखणीतून मांडले. त्यांचे अचानक आपल्यातून जाणे हे खूप पटत नाही. बाबासाहेबानी महाराष्ट्रातील नव्या पिढीला इतिहास सांगून त्यांच्यामध्ये इतिहासाबद्दल जनजागृती करण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी ट्विट करीत बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल मतही व्यक्त केले.