सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
केंद्र शासनाने केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर सुडबुध्दीने कारवाई केली आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी अल्पसंख्याकच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली जिल्हा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
बारगीर म्हणाले,”केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाहक त्रास देण्याचे कारस्थान केंद्रातील सत्ताधारी करीत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना देखील सुडबुद्धीने अटक केली आहे. ही कारवाई चुकीच्या पध्दतीने केली असल्याचे आरोप त्यांनी केला. या कारवाई विरोधात जिल्हाधिकार्यांना निवेदन देखील देण्यात आले.”
या आंदोलनात सांगली विधानसभा अध्यक्ष पद्माकर जगदाळे, युवक जिल्हा, अध्यक्ष विराज नाईक, अभिजीत हारगे, नगरसेविका संगिता हारगे, विजय माळी, विनायक हेगडे, नितीन माने, तेजस सन्मुख, अस्लम मुल्ला, आरिफ गडकरी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.