हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यावेळी रोहित पवारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडं दिली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत अहमदनगरचे पालकमंत्रीपद भूषवण्यास हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याची माहिती आहे. या सगळ्या कारणांमुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.