हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना राणावतने अनेक वादग्रस्त वक्तव्य करून मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित केली होती. कंगना कडून केलेल्या प्रत्येक आरोपावर सत्ताधारी पक्षाचे नेतेही पलटवार करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे.
‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा साधला आहे.
The drama of 'Y' grade security being provided to the people who raise the question on the dignity of Maharashtra in exchange for diverting people’s attention from Covid19, EconomicCrisis & Unemployment appears to be quid pro quo, though I hope it’s not free.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2020
दरम्यान ड्रग सेवन प्रकरणी कंगना चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.त्यावरही कंगणाने प्रत्युत्तर देताना म्हणलं की माझी केव्हाही ड्रग टेस्ट करा, दोषी सापडली तर मुंबई सोडेन.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’