बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी ‘हे’ केलं असत तर… रोहित पवारांनी शेलारांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायलाच हव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. भाजपा नेते  आशिष शेलार यांनी काल खोचक शब्दांत सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेलारांना त्याच भाषेत सुनावलं आहे.

करोनाच्या संकटात परीक्षा घेता येणार नाहीत, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारनं सुरुवातीपासूनच घेतली होती. मात्र, यूजीसीनंही परीक्षा व्हायला हव्यात अशी भूमिका घेतली होती. हा वाद शेवटी न्यायालयात गेला. त्यावर काल न्यायालयात सुनावणी झाली. राज्यांना परीक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे, पण परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येणार नाही, असं सांगत ३० सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असं निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

एका मराठी टीव्ही मालिकेतील पात्राचा उल्लेख करत शेलार यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना विनाकारण मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार…! ऐकतो कोण?,’ असं शेलार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी ट्वीटच्या माध्यमातूनच सडेतोड उत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हणले की विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आशिष शेलार तुम्ही बबड्याची सिरीयल पाहण्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या असत्या तर तुम्हांला पण ते पटलं असत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’