हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही नेत्यांनी दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली होती. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होत. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांनाच समाचार घेतला. यांनतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत मत व्यक्त केलं. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचं समर्थन केलं आहे. शेवटी निष्ठा जिंकली …. मुंबईचा किल्ला अभेद्य आहे असं त्यांनी म्हंटल.
कालच्या दोन्ही सभा बघितल्या,लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही,माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते ,जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.
मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते ,जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 6, 2022
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांनी अलोट गर्दी केली होती. ठाकरेंनीही आपल्या दमदार भाषणात शिंदे गटासह भाजपवर घणाघात केला. हिंदुत्त्वाच्या मुद्दावरून देखील त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो असं म्हणत त्यांनी भाजपला खुलं आव्हान दिले होते. तसेच महागाई, शिंदे गटाची बंडखोरी, भाजपने केलेली फसवणूक या विविध विषयांवरून विरोधकांचा समाचार घेतला.