हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात आहे अशी चर्चा सोशल माध्यमातून समोर येत आहे. प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय. याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता!
प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट…
“शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.”
… याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता!— Ashish Jadhao (@ashish_jadhao) May 2, 2021
दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उभे होते. तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी हार न मानता भाजपला जबरदस्त लढा दिला. दरम्यान ममता यांच्या विजयानंतर शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन देखील केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.