हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काही नेत्यांकडे काही रक्कम सापडत आहे. तर अनेक घडामोडी राज्यातील राजकारणात घडताना दिसत आहेत. अशातच आता शिरूर मतदार संघात एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आलेले आहे. त्याचे अपहरण करून त्या मुलाचा एका बाई सोबतचा अश्लील व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. आणि हा व्हिडिओ अशोक पवार यांना दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले जात असून त्यांच्याकडे दहा कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. 10 कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल करू. अशी धमकी अजित पवार गटातील उमेदवाराला दिली जात आहे. याबद्दलची माहिती वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.
असीम सरोदे यांची 9 नोव्हेंबर रोजी ही पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हा सगळा प्रकार सांगितला आहे. ऋषिकेश पवार हा अशोक पवार यांच्या प्रचारात व्यस्त होता. यादरम्यान त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ऋषीराज या भेटीसाठी तयार देखील झाला. कोलपेबरोबर तो मांडवगण फाट्या जवळील एका गावात गेला. त्या ठिकाणी पोचल्यानंतर कोलपेने त्याला जबरदस्तीने एका रूममध्ये कोंडले. आणि बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर ऋषीराजच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. आणि एका महिलेला बोलून त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला. ऋषिराजने या सगळ्याला विरोध केला. तेव्हा त्याला जीव मारण्याची धमकी देण्यात आली. आणि या सगळ्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यात आले.
हा सगळा प्रकार करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? असे विचारले त्यावेळी त्या लोकांनी यांनी सांगितले की, यासाठी पुण्यातील एका व्यक्तीने आम्हाला दहा कोटी रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यानंतर ऋषिराजने लोकांना मी तुम्हाला भरपूर पैसे देईल असे सांगितले. आणि जवळच्याच गावात माझा मित्र राहतो. त्याच्याकडे जाऊन पैसे घेऊ असे सांगितले. त्या गावात गेल्यानंतर आरोपीची नजर चुकवून ऋषीराजने मोबाईलवरून मेसेजच्या माध्यमातून त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधाला. त्यांनी कोलपेसह दोघांना ताब्यात घेतलेले आहे. या प्रकरणात ऋषीराजने तक्रारी केली.आणि शिरूर पोलीस स्टेशनमध्ये कोलपे बरोबर अन्य दोन व्यक्तींना आणि त्या महिलेला अटक करण्यात आले आहेत. आणि त्यांच्याविरोधी तक्रार देखील दाखल करण्यात आलेला आहे.
संपूर्ण घटनेबाबत अशोक पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “माझा मुलगा ऋषीराज बरोबर जे काही घडलं ते संताप जनक आहे. ,या घटनेमुळे माझ्यावर परिणाम झाला आहे. निवडणूक लढताना ती लोकशाही मार्गने लढा, नये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून यामागील खऱ्या आरोपीला अटक करावी.”