हाथरस प्रकरणी योगी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ; शरद पवारांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील घटना दुर्दैवी असून पीडित तरुणीच्या मृतदेहाची उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली. असा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप उमटलेला असून जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता? असा सवाल त्यांनी केला.तसेच राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे,असा आरोप शरद पवारांनी केला.

उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. म्हणून हाथरस प्रकरणावर जनतेची रिअॅक्शन उमटत आहे, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like