हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?’ असा सवाल करताना राज्यपालांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमित शहांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राज्यपाल भगतसिंग कोशारी याना टोला लगावला आहे. १९५७ सालापासून चे सर्व राज्यपाल मी पाहिलेत. तसेच काही राज्यपालांशी माझा थेट संबंध आला आहे. परंतु अस भाष्य करण्याची भूमिका यापूर्वी कोणी घेतली नाही. राज्यपाल हे देशातील अत्यंत महत्त्वाचे पद असून या पदाची किंमत राखली पाहिजे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पदाचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे असं शरद पवार म्हणाले.
देशाच्या गृहमंत्र्यानी राज्यपालांची कानउघडणी केली ही चांगली गोष्ट आहे पण स्वाभिमान असेल तर त्यांनी या पदावर राहायचं की नाही हा विचार करावा. पण जाहीरपणे गृहमंत्र्यांनी कानउघाडणी करूनही त्यांना त्याच जागेवर बसायचं असेल तर ठीक आहे. ज्याला स्वाभिमान आहे ती व्यक्ती त्या पदावर राहणार नाही असं माझं मत आहे असंही शरद पवार म्हणाले.
आपल्याकडे एक म्हण आहे पण ती इथे लागू होईल की नाही सांगता येणार नाही. ती म्हण, शहाण्याला शब्दाचा मार अशी आहे. मात्र यातील हा शब्द इथे योग्य आहे की नाही सांगता येणार नाही, असं पवार यांनी म्हटलं आणि पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’