शरद पवार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर ; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

0
34
Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दौरा करीत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर-परंडा तालुक्यापासून केली आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार सास्तूरकडे निघाले होते. त्यावेळी लोहारा इथल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. गाडीच्या खाली उतरुन पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शिवाय झालेल्या नुकसानाचा आढावा घेत परिस्थितीवर नजर टाकली. त्यांनी जातीनं या प्रकरणात लक्ष घातल्यामुळं मदत मिळण्याबाबत बळीराजाही आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. पवारांच्या या दौऱ्याकडे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आशेनं पाहत आहेत.

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची माहिती शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत. तशी माहिती खुद्द पवार यांनी सास्तुर दौऱ्यावर असताना दिली. एकटे राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करु शकत नाही. त्यामुळं केंद्रानेही मदत द्यावी, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचं यावेळी पवारांनी सांगितलं. किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here