शरद पवार- मोदी भेट; दोघांत तासभर चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजत आहे. दरम्यान या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी पवार- मोदी भेट ही कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असते

केंद्राने नव्याने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे आणि याआधी जूनमध्ये उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि मोदींची भेट झालीय.

Leave a Comment