म्हणून आत्ताच कोरोना लस घेणार नाही ; शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभर कोरोना लसीचे वितरण चालू असून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 50 केंद्रीय मंत्री कोरोना लस घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मात्र आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे

शरद पवार म्हणाले, ‘कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टय्युटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी तेथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकार शक्ती वाढविणारी लस घे, असे म्हणत मला बीसीजीची लस दिली होती. नुकतीच या कंपनीच्या दुसऱ्या एका युनिटला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा पुनावाला यांनी मला करोनाची लस टोचून घेण्याचा अग्रह केला. मात्र, मी म्हणलो आता मी नगरला निघालो आहे. तेथे दोन खासगी हॉस्पिटलची उद्घाटने आहेत. तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतो. परिस्थिती गंभीर वाटली तर मुंबईला न जाता पुण्यात येऊन लस टोचून घेतो. मात्र, आज येथे आपण आढावा घेतला तर बरे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. परिस्थिती सुधारत असल्याचे एकूण चित्र दिसत आहे. त्यामुळे आता मी पुण्याला लस घेण्यासाठी न जाता सरळ मुंबईला जातो.’

शरद पवार पुढे म्हणाले, कोरोना काळात लोक अडचणीत असताना घरात बसणे मला पटले नाही. त्यामुळे राज्यभर फिरून लोकांना दिलासा दिला. आता करोनाची स्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. तरीही लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. थोडी परिस्थिती बदलली की आपण आपल्या कामाला लागतो. मात्र, हे संकट भयाण आहे. जगाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like