महाराष्ट्रातल्या जनतेनं संधी दिली म्हणून इथपर्यंत येता आलं – शरद पवारांनी मानले जनतेचे आभार

0
41
Sharad Pawar
Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असं म्हणत पवार यांनी आभार मानले.

मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पवार म्हणाले, “माणसाला वय मिळतं. वाढतं जातं. जी विचारधारा आपण स्वीकारली. जे सूत्र स्वीकारलं त्या मार्गानं जाण्याचं काम करायचं असतं. सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करतो. शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथं तुम्हाला समजतं, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे ही स्पष्टता येते. जागृत राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे. मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असं शरद पवार म्हणाले.

“स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिजे हे त्या मातेनं स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला. अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली. आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागले,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

आज या देशाला भक्कम व्यवस्था बाबासाहेबांनी दिली. पण, त्यांनी इतरही क्षेत्रातही योगदान दिलं. ब्रिटीश सरकारनं नेमलेल्या सरकारमध्ये बाबासाहेबांकडे पाण्याचं खातं होतं. भाक्रा-नांगल धरणाच्या माध्यमातून अन्नधान्याचा प्रश्न सोडण्यास मदत झाली पाहिजे. पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार केला. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असं शरद पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here