चंद्रकांत पाटलांना झोपेतही राष्ट्रवादीचे नाव घेण्याची सवय; मंत्री जयंत पाटील यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. नगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरून भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “चंद्रकांत पाटील हे झोपेतही राष्ट्रवादीच नाव घेतात त्यांचे बोलणे तुम्ही मनावर का घेता”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सांगायचे झाले तर चंद्रकांत पाटील हे झोपेतही राष्ट्रवादीच नाव घेतात त्यांचे बोलणे तुम्ही मनावर का घेता. त्यांना काहीही बोलायची सवय आहे. त्यांच्या बोलण्याला फारसे महत्व देणे गरजेचे नाही.

सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. या आंदोलनास भेट देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई पोहोचले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान पाटील यांच्या टीकेला सडेतोड असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.