हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक केला असून राज्य संकटात आहे. अशा वेळी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी समाजकाणाच जोरदार उदाहरण सर्व राजकीय नेत्यांपुढे ठेवलं आहे. निलेश लंके यांनी तब्बल 1100 बेड ची व्यवस्था असलेलं सुशोभित कोव्हीड सेंटर उभारून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम सुरू केलं. यावेळी ते स्वतः तिथं उपस्थित राहून रुग्णांची देखभाल करू लागले.
‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत,’ असा निर्धारच निलेश लंके यांनी केला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निलेश लंके यांच कौतुक केले आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी,ता. पारनेर येथे आदरणीय Sharad Pawar साहेबांच्या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर उभारले असून त्यात १०० ऑक्सिजन बेड आहेत. स्वतः निलेश लंके या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेची विचारपूस करतात. याशिवाय या कोविड केअर सेंटरच्या कामकाजावर स्वतः देखरेख करतात.त्यांचे हे कार्य सर्वांसाठीच आदर्शवत आहे. निलेश, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहात ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अस सुप्रिया सुळे यांनी म्हंटल.
स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब व पवार साहेब यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सुत्र सांगितले त्याचे तुम्ही पालन करीत आहात,याचा आनंद वाटतो.या कोविड केअर सेंटरच्या उभारणीबद्दल तुमचे मनापासून आभार. असेही सुप्रिया ताई म्हणाल्या. या कोविड केअर सेंटरमधून प्रत्येक रुग्ण बरा होऊन आपल्या घरी सुखरुप परत जावा ही प्रार्थना. अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.