हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मी आतापर्यंत वैचारिक राजकारण पाहिलं, पण सूड घेण्यासाठी एखाद्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचं मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करुन देणारी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
पवार साहेबांनी वैचारिक राजकराण केलं पण कधीही सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला नाही. यासाठी कोणत्याही तपास यंत्रणेची मदत घेतली नाही. पण अनिल देशमुखांच्या बाबतीतही हेच झालं आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. पण ठीक आहे हम लढेंगे’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.