हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाई मुळे राज्यातील जनता होरपळून निघत असतानाच राज्य सरकार कडून वीज दरात लक्षणीय वाढ करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे- फडणवीस सरकार वर निशाणा साधला आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई पासून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होता जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं.यापूर्वी गॅसच्या दरात रु ५० ची वाढ आणि त्यानंतर दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता हे तिसरं गिफ्ट देखील जनतेला देण्यात आलं आहे.अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा.@CMOMaharashtra@mieknathshinde
— Supriya Sule (@supriya_sule) July 9, 2022
दरम्यान, महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे या वीज दरवाढीचा मोठा फटका राज्यातील जनतेला बसणार आहे. जून महिन्यापासून पुढील पाच महिने म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज ग्राहकांच्या वीज बिलात लागू होणार असून, ही वाढ प्रतियुनिट सरासरी एक रुपया असणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती.