हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी 20 हजाराहून अधिक मते मिळवत विजय संपादन केला आहे. विक्रम काळे यांचा हा सलग चौथा विजय आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेत भाजपचे उमेदवार किरण पाटील मात्र तिसऱ्या स्थानी गेलेले आहेत.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ संघासाठी एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये आत्तापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे याना तब्बल 20195 मते मिळाली. भाजपच्या किरण पाटील याना 13570 मतांवर समाधान मानावे लागले तर शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना मते मिळाली. औरंगाबादेत महाविकास आघाडी आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. अखेर महाविकास आघाडीच्या विक्रम काळे यांनी विक्रमी विजय मिळवत बाजी मारली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघात सुद्धा भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी काँग्रेसचे सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. तर कोकणात मात्र भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. अमरावती आणि नाशिक मतदारसंघातील निकाल अजून बाकी आहेत