जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे. राष्ट्रवादीकडून खडसेंना सन्मानाची जागा देण्याची तयारीही सुरु असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवर आज जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मुक्ताईनगर इथल्या घरी जात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खडसेंना भेटले. खडसे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हसत स्वागत केलं. ‘साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या’, अशी विनंती या कार्यकर्त्यांनी खडसेंना केली आहे. (NCP workers meets Eknath Khadse in Muktainagar)
एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील खडसेंचे चाहते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुक्ताईनगरला येऊन त्यांची भेट घेत आहेत.
एकनाथ खडसेंची खदखद
पुण्यातील जमीन प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्याच्या राजकारणापासून भाजप नेत्यांनी दोन हात लांबच ठेवलं. खडसेंनी आपली खदखद कधी भाजप नेतृत्वाकडे तर कधी जाहीररित्या मांडली. पण तरीही खडसेंचं पुनर्वसन काही झालं नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत खडसेंना तिकीट न देता त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यांना परभवाचा सामना करावा लागला. आपल्याच पक्षातील काही लोक त्याला जबाबदार असल्याची खडसे यांची भावना आहे.
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रथमच बोलले अजित पवार ; म्हणाले की…
वाचा सविस्तर-👉🏽https://t.co/cVmdp0PnJc
@EknathKhadseBJP @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”