परभणी | विधानपरिषद सदस्य आ. बाबाजानी दुर्राणी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी परभणीतील भाजपाचे बाळासाहेब जाधव यांच्याविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पाथरी पोलिसांत याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
भाजपाचे बाळासाहेब जाधव हे मागील काही दिवसांपासून जिल्हातील पाथरी तालूक्यातील गावोगावी जाऊन चिथावणीखोर भाषणे देणे ,व धर्मा -धर्मा मध्ये जातीय तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने व्हिडिओ तयार करत फेसबुकवर टाकून बदनामी करत आहेत असा आरोप आ. दुर्राणी करत पाथरी पोलीस ठाण्यात 21 ऑगस्ट रोजी रात्री 8. 30 वा. फिर्याद दिली आहे. बाळासाहेब जाधव हे शिवसेनेचे खा. संजय जाधव यांचे बंधु आहेत. मागील काही महिण्यापासुन ते शिवसेना सोडून भाजपामध्ये सक्रीय आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांना भाजपामध्ये कोणतेही पद देण्यात आलेले नाही. बाळासाहेब जाधव हे मागील काही दिवसांपासून पाथरी तालुक्यात सक्रीय झाले आहेत. पाथरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे आ. बाबाजानी दुर्राणी यांचा प्रभाव असून याच ठिकाणी जाधव हे त्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे करत होते.
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला समाजात बदनाम करण्याचे उद्देशाने परभणी येथील एक कथाकथीत तसेच स्वयंघोषीत नेते समजले जाणारे बाळासाहेब हरिभाऊ जाधव माझ्याविरुध्द बदनामीकारक शब्द प्रयोग करुन माझी समाजात बदनामी केली आहे. एवढेच नाही तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने तसेच जातीय दंगल घडवून आणण्याचे उद्देशाने शब्द प्रयोग करून त्याच्या व्हीडीओ क्लीप तयार करत आहेत. या क्लिप सोशल मिडीयावर प्रसारीत केल्या असुन माझी प्रतीमा मलीन केली आहे. तसेच बाळासाहेब जाधव हे मागील सहा महिण्यापासुन त्याला वाटेल त्या पध्दतीने वेगवेगळ्या गावी जावुन तसेच सोशल मिडीयावर व्हिडीओ क्लीप टाकून त्यात माझे नाव उच्चारले आहे. पाथरी शहराची लोकसंख्या वाढत आहे व पाथरी शहरातील उद्योग धंदे व व्यापार वाढत आहेत. त्यामुळे मी पाथरी तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टीकोणातून नगरपरीषद पाथरी तर्फ देवनाद्रा ग्रामपंचायत परीसराचा काही भाग हदवाढीसाठी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावाला स्थानिक नागरीकांचा पाठीबा आहे.
पाथरी तालुक्याचा विकासाचे दुष्टीकोणातून शासनाने सदर प्रस्ताव मान्यही केला आहे. परंतु शहराचा विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून बाळासाहेब जाधव यांनी रेणुका सहकारी साखर कारखाना हा पाथरी नगर परीषद हद्दीत आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल व कारखाना बंद पडेल. कारखान्यावर पाथरीच्या औरंगजेबचा कारखान्याच्या जमीनीवर डोळा आहे, अशी खोटी भाषणे करून लोकाच्या भावना भडकावित असून माझी बदनामी करून माझी प्रतीमा मलीन केली आहे. असे म्हणत मला घरात घुसून मारेन, रस्त्यावर मारेन, ठेचुन काढू असे वक्तव्य करून मला उघड – उघड धमकी देत आहे, असेही म्हटले आहे. यामुळे पाथरी तालुक्यातील व परभणी जिल्ह्यातील माझ्यावर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक तसेच समाजातील सुजाण नागरीक माझ्याकडे बाळासाहेब जाधव यांची अशी अपप्रवृत्ती बंद करा, अशी विनंती करीत आहेत. परंतु कुठल्याही स्वरुपाचा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे, असे ही म्हटले आहे
परंतू दिवसेंदिवस बाळासाहेब जाधव हे गावोगावी जावून माझ्याबाबतीत चिथावणी खोर भाषणे देवून लोकांच्या भावना भाडकवून माझी जातीवाचक शब्दप्रयोग करून धर्मा -धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावी, शांतता भंग व्हावी याचा प्रयत्न करीत आहेत. याचा परीणाम दोन समाजामध्ये भांडणे होवून गंभीर स्वरुपाचे प्रकरण घडण्याची शक्यता नाकरता येत नाही, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे अश्लिल शिवीगाळ करून दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे उद्देशाने व्हिडीओ तयार करुन सदर व्हिडीओ फेसबुकवर टाकुन माझी बदनामी केली व मला उघड उघड घरात घुसुन मारेन , रस्त्यावर मारेन ठेचुन काडेन अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणत आ . दुर्राणी यांनी बाळासाहेब जाधव यांच्या विरुध्द फिर्याद दिली आहे. पाथरी पोलिसांत याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत .