ATM मधून पैसे काढण्याआधी Cancel बटण दाबणे आवश्यक आहे का??? RBI म्हणते कि…

ATM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM : पूर्वीच्या काळी पैसे आपल्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागायचे. गेल्या काही वर्षांपासून एटीएमद्वारे ही सुविधा दिली जात आहे. मात्र, एटीएममधून पैसे काढल्यानंतर अनेकदा लोकं कॅन्सलचे बटण दाबतात. आपल्यातील बऱ्याच लोकांना असे करण्याची सवयच लागली आहे. असे करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची वाटत असलेली भीती हे आहे. यासाठी लोकं पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी कॅन्सल बटण दाबतात.

What To Do When ATMs Deduct Money From Your Bank Account But Do Not Dispense Cash?

सोशल मीडियावर बरोबर दोन वर्षांपूर्वी याच्याशी संबंधित एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये दोनदा कॅन्सल बटण दाबण्यास सांगण्यात आले होते. या बातमीमध्ये लिहिण्यात आले होते की,’ जर ATM मधून पैसे काढत असाल तर कार्ड टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटण दाबा.’ यामध्ये पुढे असेही लिहिले गेले आहे की, ‘याद्वारे जर आपला पासवर्ड चोरण्यासाठी कोणी सेटअप इन्स्टॉल केला असेल तर तो कॅन्सल होईल’. ही पोस्ट RBI ची सूचना म्हणून व्हायरल झाली होती.

सरकारला द्यावे लागले स्पष्टीकरण

ही बातमी इतकी व्हायरल झाली होती की, सरकारला याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे लागले. यावेळी, पीआयबीने या पोस्टची सत्यता तपासत ती बनावट असल्याचे म्हटले आहे. याबाबत माहिती देताना पीआयबीने ट्विटरवर लिहिले, “RBI च्या नावाने व्हायरल होत असलेल्या या बनावट पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, ATM मध्ये ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटण दाबल्याने पासवर्ड चोरी होण्यास प्रतिबंध केला जातो. ही सूचना खोटी असून आरबीआयने असे काहीही म्हंटलेले नाही.”

ATM removal costs hit retailer hard | Dear Jac | Convenience Store

एटीएमकडून माहिती डिलीट केली जाते

इथे हे जाणून घ्या कि, ATM मध्ये कोणतेही ट्रान्सझॅक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएमकडून कार्डवरील सर्व माहिती डिलीट केली जाते. म्हणजेच जर कॅन्सल बटण दाबले गेले नाही तरीही आपली माहिती तिथे सेव्ह केली जात नाही. तसेच ट्रान्सझॅक्शन पूर्ण झाल्यानंतर, मशीनवर होम स्क्रीन पुन्हा दिसू लागते. यावेळी आपल्याला कॅन्सल बटण दाबण्याची गरज नसते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…