Neeraj Chopra ने पुन्हा पटकावले गोल्ड मेडल,वर्ल्ड चॅम्पियनवर केली मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट आणि भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. ऑलिम्पिकनंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केला. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत त्याने पुन्हा गोल्ड मेडल प्राप्त केले. सध्या फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत गोल्ड मेडलवर नाव कोरत त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. नीजरच्या (Neeraj Chopra) फॅन्सला अपेक्षा होती कि तो 90 मीटरचा मार्क पार करेल, पण तसे होऊ शकले नाही. नीरजने (Neeraj Chopra) मागील आठवड्यात तुर्कुमध्ये 89.30 मीटर पर्यंत भाला फेकत पावो नुरमी स्पर्धेत सिल्वर पदक पटकावले होते. तो 90 मीटरपासून केवळ 70 सेंटीमीटरने चुकला होता. तर फिनलँडच्या ऑलिव्हर हेलांडेरने 89.83 मीटरचा थ्रो करत सूवर्ण पदक पटकावले होते.

पहिल्याच प्रयत्नात नीरजने जिंकल गोल्ड मेडल
नीरजने (Neeraj Chopra) आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.89 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याचा पुढचा प्रयत्न फाईल ठरला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो भाला फेकताना घरसला. त्यानंतर त्याने पुन्हा धोका पत्करला नाही. यापूर्वी 2012 ऑलिम्पिक टोबॅगोच्या केशॉर्न वालकॉटने 86.64 मीटरसह सिल्व्हर मेडल आपल्या नावावर केले. तर विद्यमान विश्व चॅम्पियन एंडरसन पीटर्सने 84.75 मीटरसह ब्रॉन्झ मेडल आपल्या नावावर केले. ऑलिम्पिक रजत पदक विजेता चेक गणराज्यचा जाकूब वालेश आणि पाचव्या स्थानावर राहिलेला ज्यूलियन वेबर हे खेळत नाहीत. जर्मनीचा जोहानेस वेटरही या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मागील वर्षी 86.79 मीटरचा थ्रो करत तिसऱ्या स्थानावर राहिला होता. नीरज आता 30 जून पासून डायमंड लीगच्या स्टॉकहोम मध्ये सहभागी होणार आहे.

नीरज चोप्राने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला
नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 15 जून रोजी तुर्कू, फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले, त्यादरम्यान त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने या स्पर्धेत 89.30 मीटर अंतरावर भाला फेकला. याआधी नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मार्च 2021 मध्ये झाला होता. जेव्हा त्याने 88.07 मीटर अंतरावर भाला फेकला होता. याशिवाय टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करत त्याने सुवर्ण पदक जिंकले होते.

हे पण वाचा :
घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ???

नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले

भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर

आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्याने केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Leave a Comment