NEFT, IMPS की RTGS? कोणत्या पद्धतीने पैसे जलद आणि सुरक्षित जातात? घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेटचा वापर देखील वाढलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने बँकेच्या सगळे व्यवहार देखील ऑनलाईन माध्यमातून होत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तरीदेखील आता बँकेत जाण्याची काही गरज लागत नाही. तुम्ही ऑनलाईन मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. आणि दुसऱ्याकडून पैसे घेऊ शकता.

UPI व्यतिरिक्त बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी वेगवेगळे पर्याय देखील दिले जातात. तुम्हाला जर एखाद्याला निधी ट्रान्सफर करायचा असेल, तर तुम्हाला नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT या सेवेद्वारे पैसे ट्रान्सफर करावे. लागतात किंवा RTGS चा देखील वापर केला जातो तसेच IMPS देखील वापरले जाते.

बँकेतून पैसे ट्रान्सफर करताना या तिन्हींपैकी कोणत्यातरी एका पर्यायाचा वापर केला जातो. परंतु या तिन्ही पैकी सगळ्यात जलद आणि कार्यक्षम कोणता पर्याय आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पैसे पाठवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर

आणि NEFT च्या माध्यमातून आपल्याला अनेक फायदे मिळतात. या सुविधेत भारतात कुठेही तुम्ही 24 तास पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा 365 दिवस देखील चालू असते या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही रियल टाईममध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करून घरबसल्या देखील NEFT द्वारे पैसे पाठवू शकता.

IMPS तात्काळ पेमेंट सेवा

ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे चालवली जाते. याच्या माध्यमातून तुम्ही त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा देखील 24 तास उपलब्ध असते तुम्ही मोबाईल तसेच इंटरनेट बँक शाखेतून त्याचप्रमाणे एटीएमच्या माध्यमातून देखील पैसे ट्रान्सफर करू शकता. ही एक सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित असा पर्याय आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 2 लाख रुपयांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करू शकता.

RTGS

RTGS ही एक पैसे पाठवण्याची विश्वासहार्य प्रणाली आहे. तुम्ही बँकेच्या माध्यमातून RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा देखील 24 तास चालू असते. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकता.