FD Interest Rates | ‘या’ बँकेच्या FD व्याजदरात मोठा बदल, कुठे मिळणार चांगले व्याजदर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

FD Interest Rates | यावर्षी रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. त्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक आता FD वर खूप जास्त व्याज देत आहे. यामध्ये आता आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी बँक, कॅनरा बँक इत्यादींचा समावेश आहे. तुम्हाला जर FD करायची असेल, तर तुम्ही या बँकांमध्ये करू शकता. आता या बँकांमध्ये जुलै महिन्यात FD कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

SBI बँक | FD Interest Rates

SBI बँक FD वर 3.50% ते 7.10% पर्यंत व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 4% ते 7.60% एवढे आहे. त्याचप्रमाणे 400 दिवसांच्या विशेष योजनेवर 7.10% व्याजदर मिळते.

ICICI बँक

ही बँक FD वर सामान्य लोकांना 3 टक्के ते 7.20% एवढे व्याज देते. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 टक्के व्याज देते. 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.75 टक्के ते 7.20% पेक्षा जास्त व्याजदर या बँकेत दिले जाते.

HDFC बँक

ही बँक FD वर जे सामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.25% एवढे व्याजदर देते. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी 3.50 ते 7.75 टक्के व्याजदर देते.

कॅनरा बँक

ही बँक 7 दिवस ते 10 दिवसाच्या मुदतीच्या FD वर व्याजदर सामान्य नागरिकांसाठी 4% वरून 7.22 टक्के एवढा आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.75 टक्के एवढा व्याजदर देते.

PNB बँक | FD Interest Rates

ही बँक सामान्य नागरिकांना 3.50 ते 7.25% एवढे व्याजदर देते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 7.75 टक्के एवढे व्याजदर देते. 400 दिवसांच्या कालावधीसाठी ही बँक 7.25% ते 7.75 टक्के एवढे व्याजदर देते.