वेट अँड वॉच : जिल्हा बॅंकेत ना पालकमंत्री, ना उदयदादा : डाॅ. अतुल भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. सोयीची भूमिका घेण्याऐवजी त्यावेळी काय योग्य आहे, यांचा विचार केला जाईल. सहकारी साखर कारखान्यांना अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेकडे जावे लागते. योग्य लोक निवडूण यावेत ही सर्वांची भूमिका आहे.  पालकमंत्री सन्मानीय आहेत, तर उदयदादा जवळचे मित्र होते. या दोघांमध्ये काय करायचे हे कार्यकर्त्याचे मत जाणून घेवून योग्य वेळी, योग्य निर्णय घेतला जाईल असे मत भाजपचे नेते डा. अतुल भोसले यांनी सांगितले.

कराड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्हा बॅंकेत अतुल भोसले यांची सोसायटी गटातून कोणास सहकार्य केले जाणार याविषयी त्यांनी मत मांडले.  यावेळी शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, नगरसेवक सुहास जगताप आदी उपस्थित होते.

अतुल भोसले म्हणाले, पालकमंत्री यांचे बंधू माझे चांगले मित्र आहेत. मात्र अॅड. उदयसिंह पाटील यांच्या गटाशी आमची सलगी पूर्वी होती. काही कारणांनी आता नाही तर पालकमंत्र्याच्या गटाशीही पूर्वी सलगी होती. त्यामुळे मतदार या नात्याने आम्ही योग्य ती भूमिका घेवू. तसेच आम्ही ज्यांना पाठिंबा देवू ते विजयी होतील असा आमचा दावा आहे.

 

Leave a Comment