वानखेडेंच्या चुकांवर पांघरून घालणारी टीम नसावी; जयंत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला. वानखेडेंच्या तपासाबाबत चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालणार नसावी, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दापोली येथील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आली आहे. त्यांच्याकडून सध्या वानखेडेची चौकशी केली जात आहे.

वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचे गणित लवकरच उकळेल. याचबरोबर या प्रकरणात फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासा देखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम सत्य गोष्टींची चौकशी करेल, असेही यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.