हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नेस्लेची (NeStle) उत्पादने ही फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. यात सर्वात जास्त नेस्लेच्या बेबी फूडला (Baby Food) सर्वाधिक मागणी आहे. परंतु याच बेबी फूडसंदर्भात एक मोठे गुपित उघडकीस आले आहे. नेस्लेच्या बेबी फूडमध्ये जास्त प्रमाणात साखर आढळल्याचा दावा पब्लिक आय वेबसाईटने केला आहे. यापूर्वी नेस्लेची मॅगी चर्चेत आली होती आता नेस्लेचे बेबी फूडही चर्चेचा भाग बनले आहे. त्यामुळे लहान मुलांना नेस्लेचे बेबी फूड द्यावे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेले नेस्ले ब्रँड आपल्या प्रॉडक्टमुळे अडचणीत सापडले आहे. नेस्लेचे जे दूध (Milk) आणि सेरेलॅक (Cerelac) जगभरात विकले जाते त्यात मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जातो, असे एका अहवालातून समोर आले आहे. तर साखरेचा अधिक वापर करणे लहान मुलांसाठी घातक ठरू शकते असे WHO ने म्हणले आहे. लहान मुलांना वेगवेगळ्या पदार्थातून साखर दिल्यामुळे लठ्ठपणा आणि जुने आजारही उद्भवू शकतात. त्यामुळे नेस्लेचे दूध आणि सेरेलॅक वापरण्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
महत्वाची बाब म्हणजे, नेस्ले आपल्या प्रत्येक प्रॉडक्टवर वापरण्यात आलेल्या सामग्रीचा उल्लेख करते, परंतु त्यात साखरेचे किती प्रमाण आहे हे सांगत नाही. यातूनच स्पष्ट होते की नेस्ले प्रॉडक्टमध्ये करण्यात आलेला साखरेचा वापर लपवण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात नेस्लेकडून आपल्या खरेदीदारांची फसवणूक केले जात आहे. हीच बाब पब्लिक आय वेबसाईटने उघडकीस आणली आहे. ज्यात नेस्ले आपल्या दूध आणि सेरेलॅकमध्ये साखरेचा वापर करते याबाबत खुलासा केला आहे.
दरम्यान भारतामध्ये लहान मुलांच्या आहारात सर्वात जास्त दूध आणि सेरेलॅक चा वापर केला जातो. प्रॉडक्ट्समध्ये ठरल्याप्रमाणे सरासरी 3 ग्रॅम साखर असते. तसेच, एकावेळी लहान मुलांना किती प्रमाणात सेरेलॅक देण्यात यावे हे कंपनीनी सांगते. महत्वाचे म्हणजे, इथिओपिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये तर लहान मुलांच्या प्रॉडक्टमध्ये 6 ग्राम साखर आढळून आली आहे. यातूनही लक्षात येते की काही प्रमाणात का होईना साखरेचा वापर प्रोडक्टमध्ये करण्यात येतो.