नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीविशेष | आजही तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असे म्हणुन गावोगावी हिंडून आझाद हिंद फौज उभारणारे, आय.सी.एस. अधिकार्याची नोकरी लाथाडून स्वातंत्र्यकार्यात सहभागी झालेले, काँग्रेसमधे निवडणुक लढवून गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला धुळ चारणारे, आझादहिंद फौजेचे नेतृत्व करुन इंग्रज सैन्याला सळो की पळो करुन सोडणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्याच्या एकंदर जीवणावर आधारीत जयंतीपरनिमित्त विशेष लेख..
प्रेसिडेंन्सी काॅलेजातून बी.ए. ची डीग्री ते आय.सी.एस. अधिकारी
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा मधील कटक येथे झाला. सुभाषबाबूंचे वडील जानकीनाथ हे कटक चे प्रसिद्ध वकिल होते. ते पुढे कटक शहराचे नगराध्यक्षही झाले. शालेय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुभाषबाबूंनी १९१३ साली कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी काॅलेजात प्रवेश घेतला. मात्र १९१७ साली ओअॅटेन प्रकरणामूळे प्रेसिडेन्सी काॅलेजातून त्यांची हकालपट्टी झाली आणि सुभाषबाबू कलकत्ता विद्यापिठात दाखल झाले. बी.ए. ची परिक्षा पहिल्या वर्गाने पास होऊन १९१९ साली सुभाषबाबू पुढील शिक्षणाकरता इंग्लंडच्या केब्रिज विद्यापिठात दाखल झाले. वडीलांच्या इच्छेखातर त्यांनी इंडीयन सिव्हिल सर्विसेस ची परिक्षा दिली आणि त्यात अव्वल स्थान मिळवले. मात्र आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खर्ची घालायचे असे ठरवलेल्या सुभाषबाबूंनी एशोआरामी जगता येईल अशा मोठ्या पगाराची सरकारी नोकरी धुडकाऊन लावली आणि ते इंग्लंडहून भारताकडे येण्यास निघाले.
गांधीजींची भेट
भारतात आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी मुंबई येथे महात्मा गांधींची भेट घेतली. परदेशातून सुटा बुटात आलेल्या सुभाषबाबूंना गांधीजींच्या देशी आश्रमात अवघडल्यासारखे झाले. पहिल्याच भेटीत सुभाषबाबू गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाले आणि त्यांनी देशासाठी कार्य करण्याचे निश्चित केले.
चित्तरंजन दास यांना गुरु मानले
सुभाषबाबू चित्तरंजन दास यांना गुरुस्थानी मानत. चित्तरंजन दास काँग्रेसचे नेते होते. ते १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षही होते. १९२४ साली कलकत्ता महापालिका निवडणूकीत त्यांच्या स्वराज्य पक्षाला बहूमत मिळाले. तेव्हा काही काळासाठी चित्तरंजन दास हे कलकत्त्याचे महापोिर तर सुभाषबाबू प्रमुख कार्यकारी अधिकारी बनले.
मंडालेचा तुरुंगवास
दरम्यान गोपीनाथ शहा यांनी एका इंग्रज अधिकार्याचा खून केल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आली. आॅक्टोबर १९२४ मधे इंग्रज सरकारने क्रांतिकारकांची धरपकड करण्यासाठी वटहूकूम काढला. सुभाषबाबूंना अटक करण्यात आली. सुभाष बाबूंनी आॅक्टोबर १९२४ ते १६ मे १९२७ चा काळ मंडालेच्या तुरुंगात काढला. सुभाषबाबू तरुंगातून सुटून आले आणि काही दिवसातच चित्तरंजन दास यांचा मृत्यु झाला.
संपुर्ण स्वातंत्र्याची’ सुधारणा मांडणी
यानंतर सुभाषबाबू काँग्रेस पक्षात सक्रीय झाले. १९२८ चे सायमन कमिशन वरिल बहिष्कार आंदोलन असेल किंवा १९२८ च्या कलकत्ता अधिवेशनात ‘संपुर्ण स्वातंत्र्याची’ सुधारणा मांडणी असेल, सुभाषबाबूंनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
तरुंगवास..तरुंगवास..तरुंगवास..
जानेवारी १९३० मधे सुभाषबाबूंना सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पुन्हा अटक करण्यात आली. नंतर जानेवारी १९३१ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या मिरवणूकीत भाग घेतल्याबद्दल सुभाषबाबूंना तीन महिण्यांसाठी अटक झाली. जानेवारी १९३२ मधे मात्र सुभाषबाबूंना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. युरोपात उपचारासाठी पाठवण्यात आले. तरीही प्रकृती सुधारणा होत नाही म्हणुन मग त्यांची सुटका करण्यात आली आणि दार्जिलिंगमधे नजरकैदेत ठेवण्यात अाले.
हरिपुरा आणि त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष
मधल्या काळात सुभाषबाबूंचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. देशभर नेताजींचे वारे वाहत होते. अशात १९३८ साली हरिपूरा काँग्रेस भरली. अध्यक्ष म्हणुन सुभाषबाबूंची निवड झाली. हरिपूरा नंतर त्रिपूरा काँग्रेस भरली. यावेळी मात्र सुभाषबाबूंनी अध्यक्ष व्हावे असे बर्याच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना वाटत नव्हते. तरिही सुभाषबाबूंनी निवडणुक लढवण्याचे ठरवले. महात्मा गांधींचा सुभाषबाबूंना अध्यक्ष करण्यास साफ विरोध होता. तसे त्यांनी जाहिर केले होते. अंतर्गत विरोध असूनसुद्धा सुभाषबाबू ती निवडणूक जिंकले. मात्र गांधीजींनी ती आपली हार मानली. मार्च १९३९ रोजी भरलेल्या त्रिपुरा काँग्रेसमधे सुभाषबाबूंनी मांडलेले ठराव नामंजूर करण्यात आले. तसेच नवी कार्यकारीणी आणि आगामी कार्यक्रम गांधीजींच्या सल्ल्यानेच निश्चित करण्यात यावेत असा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे अध्यक्षपदावा हा अपमान आहे असे म्हणुन एप्रिल १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
दुसरे महायुद्ध
दरम्यान सप्टेंबर १९३९ रोजी दुसर्या महायुद्धाला सुरवात झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय करावे यासंदर्भात सुभाषबाबू जीना आणि सावरकर यांना भेटले. जगभर दुसर्या महायुद्धाला सुरवात झाली होती. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र असे मानून इंग्रजांच्या शत्रुंशी हातमिळवणी करुन इंग्रजाशी दोन हात करावेत असे नेताजींना वाटत होते.
सुभाषबाबूंचे भारतातून पलायन
१५ जानेवारी १९४१ रोजी दाढी वाढवून एका मुस्लिमाचे वेश चढवून सुभाषबाबूंनी कलकत्ता सोडले. ते पेशावरमार्गे जर्मनी/रशिया मध्ये प्रवेश करण्याच्या हेतूने भारतातून इंग्रजांचा डोळा चुकवून पळ काढण्यात यशस्वी झाले.
सुभाषबाबू हिटलर भेट
सुभाषबाबू मार्च महिण्यात जर्मनीला पोहिचले. तिथे गेल्यावर त्यांनी हिटलरला भेटण्याचे ठरवले होते. हिटलरच्या मदतीने रशिया गाठण्याचे सुभाषबाबूंनी ठरवले होते. त्यानुसार २९ मे १९४१ रोजी सुभाषबाबू हिटलर ला भेटले.
आझादहिंद नभोवानी केद्राची स्थापना
सुभाषबाबूंनी जर्मन्यांच्या मदतीने आझादहिंद नभोवानी केद्राची स्थापना केली. तसेच जर्मन्यांच्या ताब्यातील भारतीय सैनिकांच्या दोन बटालियन्स उभारल्या. २६ जानेवारी १९४३ मध्ये बर्लिनमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
पाणबुडीतून जपानला प्रस्थान
८ फेब्रवारी १९४३ रोजी सुभाषबाबू हुसेन नावाच्या सहकार्यासोबत जपानला जाण्यासाठी बंद पाणबुडीत बसके. एकुण १८ आठवड्यांचा समुद्रप्रवास करुन १३ जून १९४३ रोजी सुभाषबाबू टोकीयोत उतरले.
आझादहिंद सेनेची सुत्रे सुभाषबाबूंकडे
जपानमधे सुभाषबाबूंनी जनरल टोजो यांची भेट घेतली. जुलै १९४३ रोजी आझादहिंद सेनेची सुत्रे सुभाषबाबूंनी स्विकारली. रंगुन, बॅकाॅक, सायगाव, मलाया आदी देशांना नेताजींनी भेटी दिल्या.
सिंगापूरमधे आझाद हिंद सरकारची स्थापना
आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीपद स्विकारल्लानंतर सर्वजण सुभाषबाबूंना नेताजी म्हणू लागले. नेताजींनी सिगापूरात आझाद हिंद सरकारची स्थापना केली. यात कॅ. श्रीमती लक्ष्मी महिला शाखेच्या प्रमुख पदी नेमण्यात आले. एस.ए अय्यर प्रचारमंत्री तर लेफ्ट कर्नल चतर्जी यांना अर्थमंत्री म्हणुन नेमण्यात आले. रासबिहारी बोस याना सर्वोच्च सल्लागार म्हणुन नेमण्यात आले. जपान, जर्मनी, इटली, चीन, सयान आदी राष्ट्रांनी आझाद हिंद सरकारला मान्यता दिली.
आझाद हिंद सरकारने ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले
आॅगस्ट १९४३ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सरकारने ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. आणि पाहता पाहता मार्च १९४४ मध्ये जपानी सेना आणि आझाद हिंद फौजेने भारताच्या सीमारेषेत प्रवेश केला. एप्रिल १९४४ मध्ये इंफाळवर चढाईला प्रारंभ केला. आणि काहीच दिवसांत कोहिमा आजाद हिंद फौजेच्या नियंत्रणाखाली आले. मात्र आॅगस्ट महिणा उजाडला तेव्हा नेताजींच्या सैनिकांना इंफाळ आघाडीवर अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. १९४५ साली शहानवाझ, धिल्लन हे आझादहिंद फौजेचे वाघ ब्रिटिशांच्या हाती लागले. आझाद हिंद फौजेचे सैनिक अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले.
विमान अपघात
१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी व हबीब उर रेहमान विमानाने टोकियोकडे निघालेले असताना त्यांच्या विमानाचा तैहोकू येथव वाटेत अपघात झाल्याचे वृत्त आले.
कदम कदम बढाये जा।
खुशी के गीत गाये जा।।
यह जिंदगी है कौम की।
कौम पे लुटाये जा।।
– आदर्श पाटील
८८०६३३६०३३
इतर महत्वाचे –
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…
नेताजींच्या आझादहिंद फौजेची कहाणी
भगतसिंगांनी फाशीवर जाण्यापूर्वी ही गोष्ट केली