हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Netflix कडून आता फ्री पासवर्ड शेअरिंग बिझनेस बंद करण्यासाठी नवीन मार्ग शोधला जात आहे. अलीकडेच कंपनीने चिली, कोस्टा रिका आणि पेरू येथील युझर्ससाठी ‘एड एक्स्ट्रा मेंबर’ पर्याय लाँच केला आहे. ज्याअंतर्गत आता यूझर्सना घराबाहेरील लोकांना पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. मात्र सध्या हे फीचर भारतात सुरू करण्यात आलेले नाही.
त्याच बरोबर नेटफ्लिक्सकडून इतर काही देशांमध्ये याचप्रकारे ‘Add a Home’ फिचरची घोषणा केली आहे. Netflix आता अर्जेंटिना, डोमिनिकन रिपब्लिक, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि होंडुराससह अनेक देशांमध्ये ‘Add a Home’ ची चाचणी सुरू करेल. मात्र नेटफ्लिक्स कडून अद्याप भारतातील युझर्सना चार्जिंग किंवा पासवर्ड शेअर करण्याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.
यापूर्वीच कंपनीकडून असे सूचित केले गेले होते की, या वर्षाच्या अखेरीपासून ते सर्व युझर्सकडून त्यांच्या नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करतील. त्यामुळे कंपनी येत्या काही महिन्यांत भारतातही ‘Add a Home’ सारखे फीचर्स आणतील अशी अपेक्षा करू शकतो.
नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग
पुढच्या महिन्यापासून नवीन ‘Add a Home’ बटण दिसेल. हे फीचर्स सुरु झाल्यानंतर आता वर नमूद करण्यात आलेल्या देशांमध्ये प्रत्येक Netflix अकाऊंटमध्ये वन होमचा समावेश असेल. ज्यामुळे आता एकाच घरात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा प्लॅटफॉर्म कोणत्याही डिव्हाइसवर वापरता येईल. तसेच जर आपल्याला एखाद्याला आपले Netflix अकाउंट दुसर्या घरात वापरण्याची परवानगी द्यायची असेल तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. मात्र, भारतात यासाठी किती शुल्क भरावे लागेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
युझर्स अकाउंट कंट्रोल करू शकतील
कंपनीने पुढे सांगितले की, बेसिक Netflix प्लॅनवरील युझर्सना एक अतिरिक्त घर जोडता येईल तर स्टॅण्डर्ड आणि प्रीमियम युझर्सना अनुक्रमे आणखी दोन अतिरिक्त घरे जोडता येतील. यासोबतच युझर्सना हवे तेव्हा सेटिंग पेजवरून होम हटवण्याचा पर्यायही मिळेल.
दोन लाखांपेक्षा कमी ग्राहक
कंपनीने नुकतेच जाहीर केले की, ते जाहिरातींसह एका स्वस्त सब्सक्रिप्शन योजनेची चाचणी करत आहे. सध्या, Netflix जाहिराती देत नाही, मात्र कंपनीच्या शेअर्सच्या किंमती अचानक घसरल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. कंपनीचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांना विश्वास आहे की यामुळे नेटफ्लिक्सचे शेअर्स तसेच युझर्स पुन्हा मिळवण्यात मदत होईल. या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने जाहीर केले होते की, या दशकात पहिल्यांदाच 2 लाख सब्सक्रिप्शन गमावले आहेत. त्यासाठी पासवर्ड-शेअरिंगला जबाबदार धरले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.netflix.com/
हे पण वाचा :
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 5 घटकांकडे लक्ष द्या
रशियाने Google ला ठोठावला 3,000 कोटींचा दंड !!!
Post Office ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक करून मिळवा 15 लाख रुपये !!!
Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
“पॅकेजिंगशिवाय विकल्या तर ‘या’ 14 खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू होणार नाही” – Nirmala Sitharaman