हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : सध्याच्या सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकं त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ते आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कमाईचे दुसरे एखादे साधन शोधत आहेत. मात्र यासाठी नक्की काय करावे हा प्रश्न त्यांना भेडसवतो. तर आज आपण एका अशा व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत ज्याद्वारे इतरांना रोजगार देण्याबरोबरच आपणही चांगली कामे करू शकाल.
खरं तर आज आपण पापड बनवण्याच्या व्यवसायाबाबत चर्चा करणार आहोत. यामध्ये जास्त भांडवलाची देखील गरज नाही. तसेच हा व्यवसाय घरातूनच सुरू करता येऊ शकेल. त्यासाठी सरकारकडून मदतही मिळेल. त्याचप्रमाणे, जर आपल्याला हवे असेल यासाठी भाड्याने जागा घेता येईल. New Business Idea
अशा सुरु करा व्यवसाय
या व्यवसायासाठी आपल्याकडे किमान 250 चौरस फूट जागा हवी आहे. ज्यामध्ये पापड बनवण्याचे युनिट बसवता येईल. याशिवाय 5 कामगार आणि एक सुपरवाइझर नेमावा लागेल. एकदा हा व्यवसाय सुरू झाला की, लगेचच कमाई देखील सुरू होईल. तसेच जर आपण बनवलेल्या पापडाचा दर्जा आणि चव लोकांना आवडली तर त्याच्या मागणीतही सतत वाढ होत जाईल. New Business Idea
किती खर्च येईल ???
यामध्ये सुरुवातीला 6 लाख रुपये गुंतवून जवळपास 30,000 किलो उत्पादन क्षमता तयार करता येईल. ज्याद्वारे 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही सहज मिळेल. यामध्ये आपल्याला फक्त 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. तसेच या व्यवसायातील खर्चामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल लागेल. यातील स्थिर भांडवलामध्ये 2 मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे यांसारख्या खर्चाचा समावेश असेल तर खेळत्या भांडवलामध्ये कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार, कच्चा माल आणि यूटिलिटी प्रोडक्टचा खर्च यांचा समावेश आहे. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यामध्ये समावेश होईल. New Business Idea
सरकारकडुन मिळेल चार लाख रुपयांचे कर्ज
केंद्र सरकारकडून लघु उद्योगांना प्रोत्साहन म्हणून अत्यंत स्वस्त दराने कर्ज दिले जाते. यासाठी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) एक प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार केला आहे. यामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत स्वस्त दराने 4 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याच्या मदतीने व्यवसाय सुरू करून जेव्हा कमाई सुरू होईल त्यानंतर कर्जाचे पैसे परत करता येतील. New Business Idea
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदी महागली, नवीन दर तपासा
Investment Tips :’या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून नवीन वर्षात मिळवा मोठा नफा
Videocon चे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक; ‘या’ प्रकरणात CBI ची मोठी कारवाई
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!