हिंदूंनी घरात धारदार सुरा ठेवावा; साध्वी प्रज्ञा यांचे लव्ह जिहाद वरून वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदूंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवावी असावा सल्ला त्यांनी दिला आहे . कर्नाटकातील शिवमोग्गा इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या घरात शस्त्रे ठेवा. दुसरे काही नाही तर कमीत कमी भाजी कापण्यासाठी चाकू वापरा. कधी काय परिस्थिती येईल माहीत नाही. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हंटल.

त्या पुढे म्हणाल्या, ‘लव्ह जिहाद’ ही त्यांची परंपरा आहे. काही नाही तर ते ‘लव्ह जिहाद’ करतात. प्रेम असले तरी त्यातही ते जिहाद करतात. आम्ही (हिंदू) पण प्रेम करतो. आपण देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतो. संत म्हणतात की देवाने निर्माण केलेल्या या जगात सर्व अत्याचारी आणि पापींचा अंत करा, अन्यथा प्रेमाची खरी व्याख्या इथे टिकणार नाही. त्यामुळे लव्ह जिहादमध्ये गुंतलेल्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या. तुमच्या मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा असं आवाहन साध्वी प्रज्ञा यांनी दिलं.