हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : सध्याच्या महागाईच्या काळात नोकरी बरोबरच एखादे दुसरे उत्पन्न असावे असे प्रत्येकालाच वाटते. जर आपण घरबसल्याचांगली कमाई मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयोगाची ठरेल. आज आपण टोमॅटो केचप आणि सॉसच्या व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे घरबसल्या सहजपणे मोठी कमाई करता येऊ शकते.
हे लक्षात घ्या कि, टोमॅटो केचप किंवा सॉस हे एक अत्यन्त लोकप्रिय उत्पादन आहे. तसेच यासाठी बाजारात प्रचंड मागणी देखील आहे. सध्याच्या काळात रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड स्टॉल आणि जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हे नक्कीच आढळून मिळते. अशा परिस्थितीत टोमॅटो सॉस बनवण्याचे युनिट सुरू करणे खूप फायदेशीर ठरू शकेल. New Business Idea
अशा प्रकारे सुरु करता येईल व्यवसाय
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 लाख रुपयांचे भांडवल लागेल. जे केटल, ग्राइंडर मिक्सी, बॉयलर आणि कमर्शियल स्टोव्ह खरेदी करण्यासाठी वापरता येईल. तसेच हे युनिट बसवण्यासाठी 100 यार्डची जागा लागेल. याशिवाय हे युनिट चालविण्यासाठी 9 ते 10 लोकांची आवश्यकता भासेल. याबरोबरच आपल्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी आणखी 4-5 लोकंही ठेवावे लागतील. तसेच खाण्यापिण्याशी संबंधित असल्यामुळे या व्यवसायासाठी लायसन्स देखील घ्यावे लागेल. New Business Idea
लायसन्ससाठी अशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करा
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे लायसन्स असणेही आवश्यक आहे. त्याशिवाय हा व्यवसाय करता येणार नाही. यासाठी FSSAI कडे ऑनलाइन अर्ज दाखल करावा. अर्ज केल्याच्या 10-15 दिवसांनंतर ते मिळेल. लायसन्स मिळाल्यानंतर आपले उत्पादन बाजारात विकता येईल. New Business Idea
अशा प्रकारे मिळवा सरकारी मदत
या व्यवसायासाठी सरकारकडून मदतही मिळेल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत यासाठी 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कमी दराने कर्ज मिळू शकते. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी लायसन्स दाखवावे लागेल. या अंतर्गत सरकारकडून छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी इन्सेन्टिव्ह दिले जाते, ज्यामध्ये कर्ज सुविधेचा समावेश आहे. New Business Idea
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे मिळवा दरमहा 20 हजार रुपयांची पेन्शन
Investment Tips : कर्ज, इक्विटी किंवा विमा यांपैकी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा कुठे आहे ??? तज्ञांकडून समजून घ्या
नवीन वर्षात PNB च्या ‘या’ FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा 8.10% व्याज
शेतकऱ्यांना लवकरच मिळू शकतील PM Kisan Yojana च्या13 व्या हफ्त्याचे पैसे !!! मात्र पूर्ण करावे लागेल ‘हे’ काम
Financial Changes : 1 जानेवारीपासून ‘हे’ नवे नियम लागू, त्याविषयी जाणून घ्या