हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : सध्या लोकांना कामावरून कमी करण्यात येत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. रोजगार नसल्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आपली नोकरी सांभाळून जर एखादा व्यवसाय करता आला तर… आजकाल लोकांमध्ये खाद्यसंस्कृती वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच चांगल्या चवीबरोबरच हेल्दी पदार्थ खाण्याकडेही कल वाढतो आहे. अशा परिस्थितीत पोह्यांचा व्यवसाय हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. तसेच याद्वारे आपल्याला दर महिन्याला चांगली कमाई देखील करता येऊ शकेल. चला तर मग हा व्यवसाय कसा सुरू करावा ते जाणून घेउयात…
किती खर्च येईल ???
पोहे तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 6 लाख रुपये लागतील. तसेच यासाठी सरकारकडून कर्जाची सुविधा देखील मिळेल. सध्या, केंद्र सरकारकडून स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ज्याद्वारे हा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून जवळपास 90 टक्क्यांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल. New Business Idea
‘या’ गोष्टींची आवश्यकता असेल
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 500 चौरस फुटांची जागा लागेल. जिथे पोह्याची मशीन, भट्टी, पॅकेजिंग या सर्व गोष्टींची आवश्यकता असेल. तसेच यामध्ये सुरुवातीला आवश्यक तेवढेच सामान बनवा. ज्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच पुढे जाऊन मागणीनुसार व्यवसाय वाढवता देखील येईल. New Business Idea
किती कमाई मिळेल ???
एकदा आपला बिझनेस सेटअप पूर्ण झाल्यानंतर पोहे विकायला सुरुवात करा. यामध्ये आपण किती माल बनवता आणि किती लवकर विकता यावर आपली कमाई अवलंबून असेल. तसेच आपला माल जितक्या लवकर विकला जाईल तितकी जास्त कमाई होईल. जर आपण महिन्याभरात 1,000 किलो पोहे विकले तर याद्वारे 1.40 लाख रुपयांचा नफा मिळेल. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
ईशान्येकडील सुंदर स्थळांना भेट देण्यासाठी IRCTC चे अप्रतिम टूर पॅकेज !!! किती खर्च येईल ते पहा