व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

… तर राष्ट्रवादीने पक्षाच्या चिन्हावर औरंगजेबाचा फोटो लावावा; ‘त्या’ मागणीनंतर भाजप आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहरातील किले-ए-अर्क हा मुघल शासक ‘सम्राट औरंगजेब’ ने सण 1960 मध्ये बांधलेल्या महालाचे जीर्णोद्धार करण्यात यावी, अशी मागणी औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. जर औरंगजेब हाच तुमचा आदर्श असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या लोगो वर औरंगजेबाचा फोटो लावावा, अशी टीका त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने औरंजेबाच्या नावाचा उध्दार करत आहे. त्यांना औरंगजेबाचा इतका पुळका का आहे? जितेंद्र आव्हाड सुद्धा औरंगजेबाचं कौतुक करतात तर शिवाजी महाराजांचा अपमान करतात. औरंगजेब, अफझलखान होते म्हणून शिवाजी महाराज होते असे भावना भडकवनारी विधाने करतायत म्हणजे यांचे आदर्श कोण आहेत? असा तिखट सवाल विक्रांत पाटील यांनी केला.

औरंगजेब जर तुमचे आदर्श असतील तर तसे स्पष्ट जाहीर करावे आणि त्याचा फोटो आपल्या झेंड्यावर आणि लोगो वर लावावा, असं खुलं आव्हान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं आहे. आज जनता राष्ट्रवादीचा खरा चेहरा ओळखून चुकली आहे. आगामी काळात त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत, असा इशाराही विक्रांत पाटील यांनी दिला.