New Business Idea : बाजारात प्रचंड मागणी असणाऱ्या ‘या’ दरमहा करा लाखोंची कमाई

New Business Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : आजकाल लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ चांगलीच वाढली आहे. ज्यामुळे ऑनलाईन खरेदी केलेल्या प्रोडक्ट्सच्या डिलीव्हरीसाठी देशात पुठ्ठ्याचे खोके वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. या कारणांमुळे बाजारात कार्टन बॉक्सची मागणी प्रचंड वाढली आहे. सरकारकडूनही सिंगल यूझ प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली गेली. तेव्हापासून, जवळपास सर्वच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आपल्या प्रोडक्ट्सच्या डिलीव्हरीसाठी कार्डबोर्ड बॉक्सचा वापर करत आहेत. जर आपणही एखाद्या व्यवसायात उतरण्याचा विचार करत असाल तर कार्टन बॉक्स बनवण्याचा पर्याय चांगला ठरू शकेल.

What you didn't know about cardboard boxes - Packaging Innovation

वेगाने वाढणारा व्यवसाय

हे लक्षात घ्या कि, देशात ऑनलाइन व्यवसायाच्या विस्तारासोबत कार्टन बॉक्सचा व्यवसायही झपाट्याने वाढतो आहे. तसेच आजकाल अनेक कंपन्या वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी खास डिझाइन केलेले कार्टन बॉक्स देखील वापरत आहेत. मात्र हा व्यवसाय सुरू करण्याआधी त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या गोष्टींची माहिती घ्या. जर आपल्याला हवे असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगमधून कोर्स करून या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळवता येईल. New Business Idea

MT Products Kraft 4" x 4" x 4" Corrugated Shipping/Packing Cardboard Boxes  (15 Pieces) : Amazon.in: Industrial & Scientific

नोंदणी करावी लागेल

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची नोंदणी करावी लागते. या व्यवसायासाठी एमएसएमई रजिस्ट्रेशन किंवा उद्योग आधार नोंदणी करता येईल. याद्वारे सरकारकडूनही मदत मिळू शकेल. याशिवाय, फॅक्ट्री लायसन्स, पॉल्यूशन सर्टिफिकेट आणि जीएसटी रजिस्ट्रेशन देखील आवश्यक असेल. पुठ्ठ्याचे बॉक्स बनवण्यासाठी क्राफ्ट पेपरचा वापर केला जातो. यामध्ये आपण जितक्या उत्तम दर्जाचा क्राफ्ट पेपर वापराल तितकाचा आपाल्या बॉक्सची क्वालिटी चांगली होईल. याशिवाय पिवळा स्ट्रॉबोर्ड, गोंद आणि शिवणाची तार लागेल. New Business Idea

Amazon.com: Small Sturdy Cardboard Box 5.9" x 3.9" x 1.29" Mailing  Corrugated Boxes Business Packaging Carton for Storage and Shipping Set of  10 : Office Products

किती गुंतवणूक करावी लागेल ???

या व्यवसायासाठी, सिंगल फेस पेपर कोरुगेशन मशीन, रील स्टँड लाईट मॉडेलसह बोर्ड कटर, शीट पेस्टिंग मशीन, शीट प्रेसिंग मशीन, एसेंट्रिक स्लॉट मशीन यासारख्या मशीनची गरज भासेल. याशिवाय सुमारे 5,500 चौरस फूट जाग लागेल. तसेच सेमी ऑटोमॅटिक मशिनच्या सहाय्याने हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुमारे 20 लाख रुपये खर्च करावे लागतील. तसेच फुली ऑटोमॅटिक मशीनसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च करावे लागतील. New Business Idea

demonetisation: 'World should think twice before abolishing cash' - The  Economic Times

अशा प्रकारे मिळेल नफा

या व्यवसायामध्ये भरपूर नफा मिळतो. तसेच त्याची मागणीही कायम असते. जर आपण चांगले क्लायंट मिळवले तर एका महिन्यात चार ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न सहजपणे मिळू शकेल. New Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल