सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक जाहीर झाली आहे .उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेपासून सदस्य नोंदणी सह प्रदेश अध्यक्ष निवडीच्या तांत्रिक प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण करून जानेवारी 2022 मध्ये नूतन प्रदेश कार्यकारिणीची निवड करणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी निरीक्षक अनुराग ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, दादासाहेब काळे उपस्थित होते.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या वार्तालापामध्ये विराज शिंदे म्हणाले, युवक काँग्रेस फार्म भरण्याची आज 1 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. सर्वसामान्य घरातील सर्वसमावेशक युवकांसाठी हे युवक काँग्रेसचे व्यासपीठ राहुल गांधी यांनी उपलब्ध केले आहे. या निवडणुकीसाठी सर्व जाती धर्माचे युवक सहभागी होत असतात. या प्रकियेत युवक येत असतात. हा निवडणुकीचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे. 1 नोव्हेंबर डेडलाईन आहे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे होतील.
2 डिसेंबर रोजी छाननी व होईल. त्यानंतर जे उमेदवारी अर्ज राहतील त्याचे माघार घेणे मुदत 3 नोव्हेंबर आहे. उमेदवार निश्चित होतील. 12 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत सभासद नोंदणी होईल. आॅनलाईन मतदान होईल ही प्रकिया 13 डिसेंबरपर्यंत होईल. निवडणूक आयोग निकाल जाहीर करतील एका सभासद याला चार मतांचा अधिकार राहील. पहिलं मत प्रदेशाध्यक्ष पदासाठी असेल त्यानंतर प्रदेश सरचिटणीसपदासाठी असेल तर सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी एससी आणि एसटी हे राखीव आहे आणि विधानसभा अध्यक्ष पदासाठी एक असे प्रत्येक युवक काँग्रेस सभासदसाठी चार मते देण्याचा अधिकार राहील यासाठी 18 ते 35 वयोगटाची मर्यादा राहील. सातारा जिल्हा पुणे ग्रामीण व सांगली या तीन जिल्ह्यासाठी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्षपद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे .
यासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आम्ही त्यांचे स्वागतच करू असे शिंदे म्हणाले