कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन अतुल भोसले हे बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कराड येथील निवासस्थानी गेले होते. तेव्हा त्यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते जशराज पाटील यांची अगत्यपूर्वक भेट घेतली व त्यांचेही अभिनंदन केले.
जशराजबाबा व अतुलबाबा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आजच्या भेटीने जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांनी जिल्हा बँकेतील विजयाबद्दल सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून अभिनंदन केले. यावेळी सहकार मंत्री यांचे चिरंजीव जशराज पाटील यांचीही श्री. भोसले यांनी गळाभेट घेतली.
जशराज पाटील आणि अतुल भोसले यांच्या गळाभेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. भोसले व पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून या गळाभेटीवर समाधान व्यक्त केला जात, असून भविष्यातील नव्या पर्वाची सुरुवात असे म्हटले जात आहे.




