व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कठोर नियमावली जारी ; पहा काय सुरू काय बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढला असून खबरदारी म्हणून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शहरात रात्री ११ ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील हॉटेल्स, बार, रेस्टोरेंट आता फक्त राञी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 पर्यंत अनावश्यक फिरण्यावर बंदी आहे. लग्नसमारंभ, संमेलन, खासगी कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम यावर निर्बंध घालण्यात आले असून फक्त 200 लोकांना यात सहभागी होण्याची परवानगी असेल. तर लग्न समारंभासाठी आता पोलिसांची परवानगी अत्यावश्यक असणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.