New IT Portal मधील तांत्रिक बिघाडावर अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी, उणीव दूर करण्यासाठी इन्फोसिसला दिला 15 सप्टेंबरपर्यंतचा वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमधील तांत्रिक उणिवांच्या दरम्यान सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांची भेट झाली. नाराजी व्यक्त करताना अर्थमंत्र्यांनी पारेख यांच्याशी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला की,’पोर्टल सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतरही सुरळीत का काम करत नाही?.’

मनीकंट्रोलनुसार, अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलमधील विसंगती दूर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.

इन्फोसिसनेच हे पोर्टल तयार केले आहे. याआधी रविवारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले होते की,”अर्थमंत्र्यांनी पारेख यांना बोलावले आहे आणि त्यांना समस्यांबाबत गोष्टी स्पष्ट करण्यास सांगितले आहे. अर्थमंत्र्यांनी पोर्टलच्या मुद्द्यावर इन्फोसिसच्या टीमशी चर्चा करण्याची ही दुसरी वेळ आहे.” यापूर्वी 22 जून रोजी त्यांनी इन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती.

इन्फोसिसला 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळाले
इन्फोसिसला पुढील पिढीची इन्कम टॅक्स फाईल करण्याची सिस्टीम विकसित करण्यासाठी 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. यामागील उद्दीष्ट रिटर्नचा छाननी वेळ 63 दिवसांवरून एक दिवसात कमी करणे आणि रिफंडच्या प्रक्रियेला गती देणे हा होता.

7 जून रोजी नवीन पोर्टल सुरू झाले
नवीन इन्कम टॅक्स पोर्टल http://www.incometax.gov.in 7 जून रोजी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच पोर्टलवर तांत्रिक समस्या येत आहेत.

Leave a Comment