हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून सौंकाळी नवी नियमावली जरी करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली असून दुकानांच्या वेळा रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्यात आलेल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली इथे ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा विचार केला जात असून ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असे सांगितले होते. तसेच या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असही त्यांनी स्पष्ट केलं होत.
🚨🚨#BreakTheChain – Modified Guidelines pic.twitter.com/uGyIKEKiXW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
दरम्यान, आज सायंकाळी राज्य सरकारच्यावतीने नियमावली जारी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील २५ जिल्ह्याना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर हे जिल्हे तिसऱ्या टप्प्यात असल्याने या ठिकाणी निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत.
नव्या नियमावलीत हे आहेत महत्त्वाचे निर्णय –
1) सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे.
2) सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
3) सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
4) जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
5) कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
6) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी आहे.
7) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद राहतील.
8) मुंबईतली लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंदच, नव्या नियमावलीत लोकल सोडण्यावर कुठलेही भाष्य नाही.
9) मुंबई, उपनगर आणि ठाण्याचा निर्णय आपत्कालीन विभागच घेणार आहे.